बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी !
(चालः ऊठ दे झुगारुनि बेडी...)
बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी ! केविलवाणी । मजकडे ।।
वाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी । हाकुनी
द्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी । नेति हे ॥
(अंतरा) ना दया, जरासी मया, तया पापिया,
उपजली ध्यानी,ठेविती सुरी तव मानी । गायिगे ! ।।१||
जा सांग सुखे देवासी, हिंदुची बुद्धि का ऐसी । घातली ? ।।
मी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा । सांग हे ।।
वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऐशि फजीती । सांग हे ।।
(अंतरा) अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म,
सोडूनी वर्म, पळति अडरानी ।
नुरला मम त्राता कोणी । सांग हे ॥२॥
गोपाळ कशाचे हिंदू , गो काळाचा त्या छंदू । लागला ।।
मौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला ।आवडी ॥
मज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी । हिंदुना ।।
(अंतरा) घ्या चला, विका आईला, रिकामी तिला,
म्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी । आमुची ?॥३॥
मज क्रूर समज तू अता, तरि काय करू मी माता ! । सांग हे ।।
नच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी । पाहिजे ।।
मनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे ! कठे ? दुःख है ।।
(अंतरा) करु काय, नाहि उपाय कष्टतो माय !
सांगतो कानी, तुकड्याची ऐका कोणी । विनवणी ।।४ ॥