भू-दानाची, धन-दानाची, क्रांति सफल करण्यास चला ।

(चाल: उठा गड्या अरुणोदय झाला...)
भू-दानाची, धन-दानाची, क्रांति सफल करण्यास चला ।
चला विरांनो ! गुणी-जनांनो ! सकळा झाला मार्ग खुला ।।धृ0।।
अपुली ही मालकी सोपवा, भूमीची धन-मालाची ।
करा कार्य मग निस्पृहतेने, पर्वा कसली कोणाची ? ॥१॥
सगळ्यांसाठी आपण म्हणुनी, आपणासाठी सर्व असे ।
हवे तसे घ्या, मागा समजुनी, जनतेचे कल्याण कसे ? ॥२॥
मीच नव्हे मम देश सर्व मी ही जाणिव सर्वात करा । 
तुकड्यादास म्हणे यासाठिच स्वराज्य आले घराघरा ।।३॥
                                -मुंबई दि. २८-०७-१९५३