धन्य तव करणी । करणी गुरुराया !
(चाल: अरे हरि प्याली...)
धन्य तव करणी । करणी गुरुराया !
अज्ञ पामरासि ताराया ।। धन्य ।। धृ0 ।।
मार्ग दाविसी, दाविसी मुमुक्षुला। पंथ उलटाचि चालवीला ।।
काय मी वानू? वानू गुरुराया ! ।।अज्ञ पा0 ।।१।।
निजभक्तिचे, भक्तिचे मूळस्थान । दाविसी नरकायी भजन ।।
नवल अद्भूत, अद्भूत नाद जाण । पाहता ना उरले भान ।।
दंग जाहला, जाहला पडे मौन । प्रकाशे लखलखित गगन ।।
तेज फाकले, पदि लोळे माया । अज्ञ पा0 ।।२।।
रत्न झळकती, झळकती पाच सात । न लागे रंगांचा अंत ।।
दृश्य अद्भूत, अद्भूत श्वेत रक्त । नील वर बिंदू चकचकित।।
शोभतो बरा, बरा नसे गणित । संत म्हणताति ब्रह्मज्योत ।।
पहा श्रीगुरु,श्रीगुरु हाचि पाया ।।अज्ञ पा0।।३।।
कळे कोणासी, विना कृपे ज्ञान? त्यागिला जरी निजप्राण ।।
साधु-संगती, संगती धरी नेम, खुणा पटतील हेचि ठाम ।।
दास तुकड्या तो,तुकड्या तो जपे नाम । गुरु आडकुजी निजधाम ।।
सदा सर्वदा, सर्वदा धरी पाया ।।अज्ञ पा0 ।।४।।