प्रभू ! मायेच्या आशे, भटकलो

(चाल: अगर हे शौक मिलने का...)

प्रभू ! मायेचिया आशे, भटकलो तारि गा आता ।
सख्या स्वामी दीनालागी, हो पावन ठेवितो माथा ।।धृ।।
उठे वृत्ती मनी इच्छा, अशाश्वत साधण्यासाठी ।
नको दावू अता माया, श्रमी बहु जाहलो त्राता ! ।।१।।
बहू फिरलो जनम मरणी, न ये तुमची मला स्मरणी ।
कि देई ठाव मग धरणी, कृपा कर राधिका-काता ।।२।।
पिसा बनलो मी विषयांधे, बहुगुणी पाच ते नांदे ।
म्हणे तुकड्या हरी ! वंदे, तूंच आता पिता-माता ।।३।।