भक्तांच्या हृदयवासा ! रामा

(चाल: वनवासी राम माझा..)
भक्तांच्या हृद्यवासा ! रामा ! भेटि दे अता ।।धृ0।।
दंभ-मोह-ममता सारी, दावि भीति  चित्ता ।।१।।
गर्भवास-दु:खे भारी, नको  दाव   नाथा ! ।।२।।
शांतविण्या तुकड्यादासा, प्रेम दे अनंता!।।३।।