मनाला स्थीर करवाया , धरी

        (चाल: अगर है ग्यान को पाना...) 
मनाला स्थीर करवाया, धरी गुरु-प्रेम हृदयी या ।
तयाविण अन्य ना कोणी, मनाला बोधवी सखया ! ।।धृ0।।
गुरु तो आदि-अंतीचा, गुरु-अधिकार शांतीचा ।
गुरू  निवृत्त   भ्रांतीचा, प्रगटला   देह   ताराया ।।१।।
तयाविण अन्य जे जाती, मिटेना भवभय-भ्रांती ।
गुरु तो अंति सांगाती, कठिण भव-धार ताराया ।।२।।
तयाचे शब्द ऐकावे, मनी   स्थिरवूनि   मुरखावे । ॒
तरिच पद मोक्ष ते पावे, भजा गुरु-नाम वदनी या ।।३।।
निभवला काळ तुकड्याचा,निभवि हा भाव अंतीचा ।
धन्य अधिकार तो त्याचा, किती वर्णू मी वदनी या?।।४।।