भुलू नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी

         (चाळ: अगर हे ग्यान को पाना...)
भुलू नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी ।
लूटती भोंदु आपणाते, दावुनी   थोरवी  भारी ।।धृ0।।
संत जरि पुत्र हे देती, न मरते  लोक  पृथ्वीचे ।
निकामी स्वार्थि जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ।।१।।
कावरे लोभि जे असती, भ्रष्ट होती तयाच्याने ।
न सुचते ज्ञान हे त्यांना, मिरविती भोंदुची थोरी ।।२।।
ठेवुनी साक्ष ज्ञानोबा, म्हणे ती भिंत चालविली ।
कळेना   वर्म   संतांचे, वाहती   मार्गि  काटेरी  ।।३।।
चमत्कारेच संतांची, परीक्षा होत जरि असती ।
गारुडी काय ना करिती? लावती बाग  आंबेरी ।।४।।
संत तोची जगी जाणा, जयाचे विषय हरि झाले ।
म्हणे तुकड्या निजज्ञाने, बोधुनीया जना तारी ।।५।।