मराठे शूर - वीरांनो ! निकामा स्वस्थ क बसला ?

            (चाल: अगर हे ग्यान को पाना...) 
मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ  का  बसला?।
धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास का झाला?।।ध्व0।।
बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा ।
शिवाजी शिवबा म्हणताना,रायगडि छत्रपति झाला ।।१।।
कधी शिवला न   भीतीला, रंगला   राजनीतीला ।
म्हणे दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला ।।२।।
गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला ।
राष्ट्रिचे दास्य खंडूनी, सुखी  केले  जना  सकला ।।३।।
शोभते का तुम्हा ऐसे, तयाचे  वंश  म्हणवोनी? ।
प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ? ।।४।।
अहो ! मरणे अणि जगणे, दोन्हिही सारखे अपणा ।
तो तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ।।५।।