मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष
(चाल: जगी हा खास वेड्यांचा...)
मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष्य विषयाचे ।।धू0।।
प्रपंची कोण सुखि झाला? न दिसला, ऐकिला ऐसा ।
जयाने राम वश केला, वंदिती पाय जन त्याचे ।।१।।
विषय हे नाडिती देहा, नि आयू ही फुका धाडी ।
प्रभू-सुख घे जिवी धरूनी, न भय मग जन्म -मरणाचे ।।२।।
म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्रीहरी -नामा ।
नामची नेइ निजधामा, न इतरे कोणि कामाचे ।।३।।