भारती रहीवासियांनो । वाचवा जिव गायिचा

(चाल: ठेविले पाऊल दारी...)
भारती रहिवासियांनो । वाचवा जिव गायिचा ।।धृ0।।
सांगतो इतिहास ऐसा, भारताच्या ग्रंथिचा ।
बहुमोल आम्हा गाय हे, जणु प्राणची मम आईचा ।।१।।
देश   हा   कृषि - उद्यमाचा, भोवताली   वेष्टिला ।
धान्य बहु पिकती फळे, हा भाग त्या गो-मायिचा ।।२।।
कष्ट साहूनि देतसे, दहि-दटूध-लोणी  ही  जशी ।
पुत्र   देउनि   आपुला, वाहवीतसे   भर   शेतिचा ।।३।।
दास तुकड्या सांगतो, शोधोनि पाहांवे   बुध्दिने ।
जीव का वधता तिचा? हा घात निश्‍चयि आमुचा ।।४।।