प्रेम नाही का मनात ? प्रेम नाही का ?
(चाल: धन्य जाहला माझा...)
प्रेम नाहि का मनात? प्रेम नाहि का? ।।धृ0।।
जन्माचे दिवस किती ? दिवसा मधि रात्र किती ? ।
मधुनि मधुनि किति मरती, नेम राहि का? ।।१।।
किति गेले, किति मेले? किति पुरले अणि मुरले?।
कोण दिवस काय फले? कोणि गाइ का? ।।२।।
एक दिवस वीरपणी, एक दिवस वृद्ध तनी ।
फिरत चक्र हे गगनी, ठाव नाहि का? ।।३।।
मग आता का उशीर ? भज बापा ! तो मुरारा ।
तुकड्याची हाक ऐक, कर्णि राहि का? ।।४।।