भाग्याने लाभला देह हा, कू मार्गाने धाडू नको

(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला...)
भाग्याने लाभला देह हा, कू-मार्गाने  धाडु   नको । 
पापे करुनी वडील अपुले, दुःखामाजी पाडु नको ।।धृ 0।।
दुसऱ्याची कापुनी मान कधि, सावकार तू होउ नको ।
सत्यपणाने मिळवी पैसा, चोराला कधि देउ नको ।।१।।
गुरू आई अणि बाप थोर जन,यांची आज्ञा मोड नको । ॒ज्या मार्गाने लाखो तरले, असा मार्ग तू सोडु नको ।।२।।
किती ज्ञान झाले तरि अंगी, गर्व कुणाला दाबु नको ।
तुकड्यादास म्हणे या जन्मी, उद्धरल्याविण राहु नको ।।३।।