देश सांभाळा , धर्महि पाळा
(चाल: घाट डोईवर...)
देश सांभाळा, धर्महि पाळा ।
संस्कृति सांगे, ऐकता का हो ! ऐकता का? ।।धृ0।।
भारत - गौरव जग जव पाहिल ।
तरिच सकळही सुख संपादिल ।
वैभव सगळे मिळेल लोका,
सर्व लोका हो ! सर्व 0।।१।।
गरिब - अमिर हा भेदचि वाया ।
सगळ्यांचे श्रम, धन सगळ्या या ।
जाति कशाच्या? मानव आम्ही !
हाक ठोका हो ! हाक 0।।२।।
नवभारत हे नव्या युगाचे !
सद्विचार अणि सदधर्माचे !
तुकड्यादास म्हणे, घ्या समजा,
टाळा धोका हो ! टाळा 0।।३।।