गुरु - गोविंद दोन्ही आले
(चाल: विठ्ठल माझा लेकुरवाळा...)
गुरु - गोविंद दोन्ही आले । मन तल्लिन भावे झाले ।।धृ0।।
आधी दर्शन घ्यावे कैसे? कोणा प्रथम पुजावे कैसे ?
मनी संशय हा होतसे , मज भानच नाही उरले ।।१।।
दोन्ही असे एकाचे हृद्यी,साखर-गोडी भिन्नचि नाही ।
परी गुरुची होता ग्वाही, प्रभु -ज्ञान तयाने कळले ।।२।।
म्हणुनि आधी गुरुसी पुजले,त्यानेचि प्रभुसि दर्शविले ।
मन प्रसन्न अंतरि झाले , तुकड्याने गुरुसि आळविले ।।३।।