मन तुजविण स्थिर ना राही
(चाल: जो आवडतो सर्वाला...)
मन तुजविण स्थिर ना राही,प्रभू रे! दर्शन दे लवलाही ।।धृ।।
नेत्र बघाया झुरती विरहे ,ऐकाया तव मुरली - स्वर हे ।
मोर-मुकुट कुंडल सुखकर हे,फाकली नव रत्नप्रभा ही ।। प्रभु रे 0।।१।।
कटि पीतांबर अति सुंदर हे , जणू अंगची नीलांबर हे
बघता मनि येती पाझर हे, जीवभाव असा दे ग्वाही ।। प्रभु रे ।।२।।
जणु ताय्रांना चंद्र असावा, सर्व नद्यांना सागर व्हावा ।
तुकड्यादासा तूच विसावा, तू सतत असाची राही ।। प्रभु रे0।।३।।