प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी

(चाल: आम्ही सर्व सुखी हो म्हणुनी..) 
प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी ।
आनंद क्षण तरि   देत  जा, इकडे  कधी  कधी ।।धृ0।।
विश्व हे तुझिया रुपाचे, क्षेत्र   हे  मी  जाणतो ।
कृपानेत्र तरी फिरवित जा, इकडे कधी कधी ।।१।।
अमुच्या जिवाचा जीव तू,सर्वस्व जीवन-हेतू तू ।
पदधूळ तरि उधळीत जा, इकडे  कधी  कधी ।।२।।
तव नाम भोजन-तृप्तिसम, वाटे मनासी श्रीगुरु ।
मुखकमल तरि वळवीत जा,इकडे कधी कधी ।।३।।
तुकड्या म्हणे दुजी साधना, काही रुचेना मोहना ।
शिरि वरदहस्त ठेवीत जा, इकडे   कधी   कधी ।।४।।