मजपासुनी दुर का पळता ?

(चाल: डोळे मोडित राधा चाले...)
मजपासुनी दुर का पळता ?
उद्धराल कळता कळता हो ! ।।धृ0।।
जे जे व्यसन तुम्हाला जडले, ते ते अंतरी मजला कळले !
दूर होईल वळता वळता   हो ! ।। मजपासुनी0 ।।१।।
आम्ही सर्वची तसले होतो, सांगा हो ! कुणि म्हणेल नव्हतो ।
दया धरुनी एकतरी चळता हो ! ।।मजपासुनी0।।२।।
अहो जीव हा चुकिचा पात्र, तो जन्म घे म्हणुनि सर्वत्र ।
क्वचित्‌ची यात निर्मलता हो ! ।। मजपासुरी0 ।।३।।
तुकड्यादास म्हणे व्हा सांगाती, पापी असे तरी मजला चालती ।
घ्या    गुरुदेवाची   संथा   हो ! ।। मजपासूनी0।।४।।