आम्ही भजन करु हर्षाने

(चाल: दिन चार घडीका जीना...)
आम्ही भजन करू हर्षाने,खंजरी टाळ तारीने ! ।।ध0।।
सर्वांचा मेळ मिळवुनी, अति स्वच्छ भूमि पाहोनी ।
लक्ष ठेवू शब्दार्थाने , खंजरी टाळ तारीने ! ।।१।।
रांगेत बसू येवोनी, सद्भाव मनासी धरुनी ।
उन्नतिचे गाऊ गाणे, खंजरी टाळ तारीने! ।।२।।
आचार शुध्द ठेवोनी, अम्ही सदा राहु निर्व्यसनी ।
सेवाची करु जिवप्राणे, खंजरी टाळ तारीने ! ।।३।।
सद्भाव ठेवुनी अंगी, रंगुया भक्तिच्या रंगी ।
तुकड्या म्हणे उध्दरु तेणे, खंजरी टाळ तारीने! ।।४।।