भाव नाही, भक्ती नाही, अभागी आम्ही !

(चाल: एक परदेशी मेरा दिल...)
भाव नाही, भक्ति नाही, अभागी आम्ही !
ज्ञान नाही, ध्यान नाही, आहो रिकामी ! !
काम नाही, धाम नाही, ऐश आरामी !
प्रेम नाही, नेम नाही, सदा निकामी ।।धू0।।
ऐश्या अधमाचा उपयोग  व्हावया ।
तुझे हे शरीर सतमार्गासी जावया ।
उध्दाराया   जिवा  कोण,   घेईल   हमी ।।१।।
जिकडे जावे तिकडे सर्व स्वार्थाचे जाळे ।
सत्य ज्ञान देवुनि कोण देई निवाळे ।
कोणा शरण जावे-सांगा सद्गुरु स्वामी ।।२।।
दिसतो एक मार्ग संत-संगती   बरी ।
मूर्खासी ही शिकवोनी शहाणे करी ।
तुकड्यादास म्हणे, तेची लावती रामी ।।३।।
-गुरुकुंज आश्रम, दि. १२-१२-१९५९