भक्तिविणा, उद्धार नाही कुणाचा
(चाल: भैय्या मेरे राखी के..)
भक्तिविणा, उध्दार नाही कुणाचा, भक्तिसाठी निर्धार पाहिजे मनाचा ।
ऐका हा भाव जिवाचा, जिवाचा ।।धृ0।।
हे ऐकाना संत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे ।
शांति-सुखाचे आगर बरवे, आपण तरूनी दुज्या तारावे ।
तोडिल फास यमाचा, यमाचा ।। भक्तिविणा, उद्भार0 ।।१।।
तरण्यासी भवसागर सगळा, अवघड हा षडरिपुचा मेळा ।
पार कराया,या कळिकाळा,नाही दुजा कुणि मार्ग निराळा ।
निज संदेश शिवाचा, शिवाचा ।। भक्तिविणा, उद्धार 0।।२।।
तुकड्यादास म्हणे ऐकाना,नित्य प्रभूचे भजन कराना।
व्यसने सगळी सोडूनि द्याना,सरळपणाचे जिवन जगाना ।
लोभ करा सर्वांचा, सर्वांचा ।। भक्तिविणा, उद्धार 0।।३।।
-गुरुकुंज आश्रम, दि. १0-0७-१९५९