मंत्रतंत्र नच काही विचारी, अमुची गुरुमाता

मंत्रतंत्र नच काही विचारी, अमुची गुरुमाता ।
भक्ती-श्रद्धा मनी पाहुनी, कर ठेवी माथा ।।धृ०।।
देह-अहंता सोडुनि जाती, जे जन गुरुपाया।
ज्ञान-दान देउनी गुरू तो, उध्दरितो काया।।१॥|
सद्गुरु-वचनी निश्चय ठेवुनी, वागति जे तेसे।

मोक्ष - सुखाचे धनी होउनी, निज स्वरुपी बैसे ।।२।|
अखंड वृत्ती सद्गुण-स्वरुपी, जे ज्ञानी धरिती ।
गुरूरूप त्या ज्ञान्या सद्गुरू, एक क्षणि करिती ।।३॥|
तुकड्यादासा असा भरवसा, आला आचरणे ।
करा करा रे ! सकळ असेची, सांगे नम्रपणे ।।४॥|