कोण कुणाला सहकार देतो ?

(चाल: चाल दिवाळी...)
कोण कुणाला सहकार देतो ?
असा प्रीय मानव मला   दाखवा  तो ।।धृ0।।
अपुलिया स्वार्थासाठी गोड बोलणारे ।
संकटाचे वेळी भाव - भक्ति  दावणारे ।।
मानरे, मानरे ! हवा   म्हणे  जो  तो ।।१।।
आपुले म्हणोनी कोणी साह्य करतील ।
पाहूनिया परका मात्र ढोंगी हासतील ।।
ग्वाही रे, ग्वाही रे, हजाराची देतो ।।२।।
असे जोवरी या देशी खेळ चालतील ।
तोवरी पडेना बाबा पुढती पाऊली ।
जाणारे ! जाणारे ! हा प्रगतीचा हेत ।।३।।
कोणि-जाति -पंथी येवो,आपुला म्हणावा ।
वेळ पडे तेथे जीवा सहकार   द्यावा ।।
ऐकरे, ऐकरे, धन्य   हो    जगाला  ।।४।।
धर्म मानवाचा ज्याने खरा स्विकारावा ।
त्याने मानवाच्यासाठी जीव -प्राण द्यावा ! !
सर्व हे, सर्व हे तुकड्या म्हणे सत्य ।।५।।