भाग्य कुणाला लाभे ऐसे ?
(राग: मिश्र काफी, ताल: तीन ताल)
भाग्य कुणाला लाभे ऐसे ?
सद्गुण कार्या वेळ जातसे ! ।।धृ0।।
कधि नच घडते व्यसनाधिनता ।
जो-जो भेटे त्यासि नम्रता ।।
चित्त रंगले नामस्मरणी -
निर्मळ सरळ स्वभाव जयाचे ।।भाग्य0।।१।।
अंतर-बाह्य शुध्द राहणी ।
मयदिची प्रेमळ वाणी ।।
सकळ कळे परि गर्व न अंगी -
कर्ण न घेती दोष कुणाचे ।। भाग्य0 ।।२।।
असंग्रही, परि त्यागी जीवन ।
सदा-सर्वदा विवेक - चिंतन ।।
तुकड्यादास म्हणे ज्या कळले
ते लोभी होतील प्रभूचे ! ।। भाग्य0।।३।।
-गुरुकुज आश्रम, दि. 0७-१९-१९६१