निर्भयपद देवाचे !
(चाल-संशय का मनी आला?...)
निर्भयपद देवाचे !
विसरु नका मनि साचे ।। गडे हो ! ।।धृ0।।
क्षणिक सुखाला मोहूनि जन हे ।
घालती वाया विषयी मन हे ।।
खोविति हित जन्माचे ।। गडे हो ! ।।१।।
आजवरी जे जन्मुनि गेले ।
त्यागाने या जगी वर्तले ।।
पुजती चरण तयाचे ! ।। गडे हो ! ।।२।।
संतसंगतिने ज्ञान शिकावे ।
अनुभव घेउनि सुख भोगाव ।।
प्रभुच्या अमर पदाचे ।। गडे हो ! ।।३।।
सकळ जगत हे ज्याने जगते ।
त्याचे ज्ञान न कळता मग ते ।।
जाती जन्म फुकाचे ! ।। गडे हो ! ।।४।।
तुकड्यादास म्हणे यासाठी ।
बळकट हरिच्या बांधा गाठी ।।
मार्ग त्यजा विषयाचे ।। गडे हो ! ।।५।।
-गुरुकुंज आश्रम, दि. 0७-११-१९६१