भेद कुणी हा केला ?

(चाल- संशय का मनी आला ?...)
भेद कुणी  हा    केला ?
बाधक जो जीवनाला । गडे हो ! ।।धृ0।।
राष्ट्रियता आणि धर्म   वेगळे ।
भक्ति-लळा आणि कर्म वेगळे ।।
संशय का हा आला? ।। गडे हो ! ।।१।।
राष्ट्र सोडुनी धर्मा भोवति ।
श्रीकृष्णाची आली    मूर्ति ।।
सांगे कोण तुम्हाला ? ।। गडे हो ! ।।२।।
युध्द करोनी धर्म    राखला ।
राष्ट्राचा अभिमान जागला ।।
भिन्न न कोणि कुणाला ! ।।गडे हो ! ।।३।।
म्हणुनि सांगतो, राष्ट्र   जागवा ।
तुकड्या म्हणे,तो धर्म म्हणावा ।।
मिळेल   मान    तयाला ।। गडे हो ! ।।४।।
                        -गुरुकुज आश्रम, दि. 0७-११-१९६१