प्रभु ! सांग तुझ्यामधे काय असे ?

(चाल: मेरा दिल अब तेरा ओ साजना...)
प्रभु ! सांग तुझ्यामधे काय असे ? 
माझे मन तुज पाहण्यासी लालसे ।।धृ0।।
कितितरि भक्तांनी तुजसाठी, अपुले प्राण दिले रे ।
त्यागुनि धन-दौलत-संसारा, तुजला बश केले रे ! ।
मज कळतचि  नाही   वेड  कसे ! ।।१।। 
काय करावे यासाठी बघ, सांग जरातरि काही ?
ज्यांना-ज्यांना जाई विचारी -कोणिहि सांगत नाही ! ।
म्हणुनिच    रडतो   मी   साहसे ! ।।२।।
मज गमते तू सागर जैसा, प्रेमाचा भरलासे ! !
म्हणुनिच तुजला ध्याती सगळे- जीवे शिवे उल्हासे ! !
तुकड्या म्हणे,आता   वेळ   नसे ! ।।३।।
                              - नवी दिल्ली, दि. 0७-१२-१९६०