प्रभु ! भक्ति तुझी , मन शांत करी
(चाल: मन-मन्दिर में शृंगार किया...)
प्रभु ! भक्ति तुझी, मन शांत करी ,
जणु मेघ वळे चातकावरी ! ।।धृ0।।
भव-संसारी दुःख न सरते ।
होत नसे कामना पुरी ! ।।१।।
अनुभव हा सकळासी येतो ।
परि न बुध्दि कळते ही खरी ! ।।२।।
तव स्वरुपाचे ध्यानचि अमृत ।
अमर करी या संसारी ! ।।३।।
तुकड्यादासा नाप - स्मरणे ।
अति आनंदू होत उरी ! ।।४।।
-वरोरा, दि. 0२-१0 -१९६१