भावना दुखवू नका हो कुणी !
(चाल : लाजली सीता स्वयंवराला...)
भावना दुखवू नका हो कुणी !
बोलली भारत - माता झणीं ! ! ।।धृ0।।
सुपुत्र सगळे माझ्या उदरी ।
जन्मा आले बहु नर नारी ।
उद्योगास्तव भिन्न वाटली ।।
कुणि नच नीच - ऊंच यातुनी ।।१।।
प्रदेश-भाषा ओळखि पुरती ।
परि राष्ट्राला ती ना पुरती ।।
म्हणुनि हिंदला हिंदिचि शोभे -
पावली हा अनुभव घेउनी ! ।।२।।
भारत - पुत्रे अम्हा म्हणाया ।
कमीपणा वाटो न कुणाया ।
तुकड्यादास म्हणे, राष्ट्रीयता -
एकता, पाडू नका खंडुनी ! ।।३।।
गुरुकुंज आश्रम, दि. 0१-११-१९६१