मानवा ! अमर प्रभु दरबार !
(चाल: उद्वावा अजब तुझे सरकार...)
मानवा ! अमर प्रभू - दरबार !
गुणवंतांना मान निरंतर, जरि तो कृश दिसणार ! ।।धृ0।।
कोणि पुसेना वर-वर धन हे ।
जे दिसते ते चंचल मन हे ।।
घासुनी -घासुनी परोपकारे ,
जे अंती उरणार, मानवा ! अमर प्रभू- दरबार ! ।।१।।
पवित्र जे नर शील मानसी ।
पतिव्रता त्या सेवा - राशी ।।
त्यांना न रुचे, हार-तुरे - हे -
क्षणीक हा व्यवहार, मानवा ! अमर प्रभू-दरबार ! ।।२।।
चोराने जरि मान मिळविला ।
तरि कळताचि, घृणित तयाला ।।
करुनि सोडिती, घरि-दारी बघ ,
साधु सदा पुजणार, मानवा ! अमर प्रभू-दरबार ! ।।३।।
जिवंतपणि जरि चिंता असली ।
तरि न तयाचे फळती तसली ।।
तुकड्यादासा, अनुभव येतो,
कळला सगळा सार ! मानवा ! अमर प्रभू-द्रबार !! ।।४।।
- श्रीरापपूर, दि. २0-१0-१९६१