मानवा ! का चिंता वाहतो ?

(चाल: उद्धवा अजब तुझे सरकार...)
मानवा ! का चिंता वाहतो ?
होणारे ते चुके न केव्हा, प्रभु सगळे पाहतो ! ।।धृ0।।
नर जन्माला आला जेव्हा ?
तू कधि केले होते   कामा ? ?
परी तुझ्या पोटाची कळकळ, जन्मताचि वाहतो ! ।।१।।
अजगर पडला पडुनी राही ।
चालतसे    मुंगीच्या   पायी ! !
अचूक त्याची खळगी भरण्या, जागिच कुणि दाहतो ! ।।२।।
पोपट - मैना   मारि   भरारी ।
कुठले त्यांना स्थान नोकरी ? 
परी चरुनिया, रोजची येती,मन्मनि उत्साहतो ! ।।३।।
म्हणुनि सांगतो स्मर तू हरिला ।
विसरु   नको  रे  सहकार्याला ?
तुकड्यादासा,अनुभव ऐसा,घडि-घडि मज राहतो ! ।।४।।
                        -गुरुकुंज आश्रम, दि. 0१-११-१९६१