भाविकांच्या मेळ्यात दिसला हरु !
(चाल: गाडीवाले ! गाडी धीरे...)
भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी !
धावोनिया सगळ्यांची कामे करी ।।धृ0।।
विद्वानांच्या, पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही !
सत्ताधारी, महंतखोरी यांना दुरुनी पाही ! !
नम्र सदा सेवेला असती, बसतो त्यांचे घरी ! ।।१।।
शेतावरती मजूर जाती, जातो त्यांच्यासवे !
भाकर-भाजी खाउनि राजी, गात असे गोडवे ! !
जातपातहि कधी न पुसली, मोहित प्रेमावरी ! ।।२।।
ईमानदारी प्रिय तयाला, सदाचार आवडे ।
कुणी कुणाचे रक्त शोषिता, क्रोध हरीला चढे ।।
तुकड्यादास म्हणे भक्तिने, नाचतसे पंढरी ! ।।३।।
-इन्दोर, दि. 0४-0८-१९६0