देव पाय वंदी , त्याचे देव पाय वंदी

(चाल: गोकुळिचा राजा माझा...)
देव पाय वंदी, त्याचे देव   पाय  वंदी ।।धृ0।।
सेवेसाठी जीवन ज्याचे, घेणे देणे नाही कुणाचे ।
राहणीने स्वच्छंदी, त्याचे देव   पाय   वंदी ।।१।।
सर्वांभूति एकचि दृष्टि,हिन-दीनास्तव होउनि कष्टी ।
तरीही दिसे आनंदी, त्याचे देव पाय   वंदी ।।२।।
अपुला-परका भेद न ज्याला,चारित्र्याचा सदा भुकेला।
तुकड्या त्याचा फंदी, त्याचे देव पाय वंदी ! ।।३।।
                                        -कापसी, दि. 0९-0९-१९६0