बेचैन तुझ्याविण जीव जसा
(चाल: दो दिन के लिये मेहमान यहाँ...)
बेचैन तुझ्याविण जीव जसा,जणु गाईस पाहात वत्स फिरे ।
तडफे,नच पाणि मिळे राहण्या,त्या मासळिचा जणु प्राण हरे ।।धू0।।
कितिदा तरि नाम स्मरु वंदनी? मंदीर धरोनि बसू कितिदा ? ।
प्रभू ? का न मिळे ? न कळे मंजसी,जिव भाव सदा हृदयात झुरे ।।१।।
वर्षांसम जाति घडी पळ हे, किती वेळ धरावा धीर तरी ? ।
तुकड्या म्हणे भेट सख्या! मजसी,भवसागर हा मग पार तरे ।।२।।
- परभणी, दि. १३-0१-१९५५