नको वेळ लावू प्रभू ! भेटण्याला
(चाल: तेरे सहारे सुधर जायेंगे..)
नको वेळ लावू प्रभू ! भेटण्याला, मिळेना पुन्हा या शरीरे तुम्हाला ।।धृ0।।
जिवाला अति वेड तव दर्शनाचे, गमेना वनी-राणि-महाली कुणाचे ।
त्यजावा कि हा प्राण वाटे मनाला ! ।। मिळेना 0।।१।।
सती ही पतीवीण का सूख पावे ? वनी वत्स गायीविणा का रहावे ?
तसा मी तुझ्या दर्शनासी भुकेला ।। मिळेना0।।२।।
कुठेही निघोनी कधी जाऊ वाटे, कुणा बोलता जीव क्षणही न कंठे ।
म्हणे दास तुकड्या,अता धीर गेला ।। मिळेना0।।३।।
-परभणी, दि. १३-0१-१९५५