पावन तुमचे चरण - कमल प्रभु !

( चाल: हे री मे तो प्रेम दिवानी..) :
पावन तुमचे चरण -कमल प्रभु ! तारिल अमुची नाव ।।धृ0।।
हृदयि भरवसा धरुनि स्मरे मी,नच दुसरी कुणि हाव । 
तव दर्शन हे शांति जिवांची, म्हणुनिच धरली धाव ।।१।।
कठिण कठिण हे भव-भय वाटे, न सुचे काहि उपाव ।
म्हणुनिच धरली कास तुझी मी, उध्दरि हा जिवभाव ।।२।।
नेत्र कटाक्षे क्षण जरि बघशी, तुटतिल बंधन डाव ।
तुकड्यादास प्रसन्न मनाने, तरतिल रंक नि राव ।।३।।
                             - निजामाबाद्‌, दि.९७-0१-१९५५