मज सोडू नको परका म्हणुनी
(चाल: दो दिनके लिये मेहमान..)
मज सोडू नको परका म्हणुनी, छळतील रिपू अति दुःखद हे ।
दरबारि तुझ्या अति शांति मिळे, रजधूळ तुझी बहु सौख्यद् हे ।।धृ0।।
कुणी काहि म्हणो नच लाज मला ,परि तू न म्हणे हा धाक जीवा ।
म्हणशील तसे करु यत्न अम्ही,झणि जाळुनिया विषयी मद हे ।।१।।
हे शीर दिले नव्हे-सर्व दिले, व्हायास अनन्य, तुझा म्हणण्या ।
तुकड्या न उरो अपुला म्हणण्या, हे बोलतची ये गद्गद हे ।।२।।
- परभणी, दि. १३-0१-१९५५