नश्वर हा देह सारा, भ्रमतो का मोहुनी
(चाल- दिसला का माझा कान्हा..)
नश्वर हा देह सारा, भ्रमतो का मोहुनी ? ।।धृ0।।
देहा सजवुनि सुंदर केले, विश्वासुनि त्यावरीच बसले ।
मग का अंती ये कोणी? भ्रमतो का मोहुनी ? ।।१।।
स्वार्थासाठी पाप करावे, धर्मनितिला सोडुनि द्यावे ।
भोगावे मग हे मरुनी, भ्रमतो का मोहूनी? ।।२।।
तुकड्यादास म्हणे हे समजा, विसरुनि जा ह्या वाइंट गमजा ।
मन लावा ईश्वर - स्मरणी,भ्रमतो का मोहुनी ?।।३।।
- काटोल-मार्ग, दि.0६-११-१९५४