प्रीतिचा मोह आवरेना
(चाले: कुणी म्हणती स्वराज्य आल...)
प्रीतिचा मोह आवरेना । सोडिना तुला सोडिना ।।धृ0।।
किती जन्म घातले तरी । भेटसी कुणा ना हरी ।
गवसला तू मज या ध्याना ।। सोडिना 0 ।।१।।
अश्रुंनी चरण न्हाणुनी । भक्तीची माळ घालुनी ।
ओवाळित नमुनी प्राणा ।। सोडिना 0 ।।२।।
किति रुप तुझे साजिरे । जणु चंद्र लाजतो की रे ।
तुकड्याची हाक ऐकिना ।। सोडिना 0 ।।३।।
- हैद्राबाद, दि. १६-0१-१९५५