भारताचा पोर तू तेजाची कोर तू
(चाल: सुनते थे नाम हम...)
भारताचा पोर तू तेजाची कोर तू ,
चाल पुढे सेवका ! मोह सोडुनी 0।।धृ0।।
मागासल्यांची सेवा कराया । माणुसकीचा मार्ग धराया
शिकवी घरोघर जाउनी ।
लाज अता सोड तू, चित्त कामि जोड तू,
चाल पुढे सेवका । मोह सोडुनी 0।।१।।
आल स्वराज्य, तुझी पुण्याई मोठी ! सुराज्य लाभाया लाविना कसोटी ।
देशासी घर मानुनी ।
मानु नको घोर तू, ठेवि जोरसोर तू,
चाल पुढे सेवका ! मोह सोडुनी 0।।२।।
श्रमासी मान दे,कष्टासि लागना,व्यसनीसि सोडुनिया सद्भावि जागना ।
भेद सकलही सोडुनी ।
तुकड्याची हाक तू, जनतेला सांग तू,
चाल पुढे सेवका ! मोह सोडुनी0।।३।।
गुरुकुंज, दि. १२-0८-१९५४