बोल सख्या घनश्यामा, रामा! निष्ठुर का मनि झाला?

बोल सख्या घनश्यामा, रामा! निष्ठुर का मनि झाला?
आठव घे दासांचा अपुल्या, ये पावन करण्याला ।।धू०।।
भक्तकामकल्पद्रुम म्हणविसि, धावसि आपत्काला।
वेळ अशी ही आली जवळी, तुजविण सांगु कुणाला? ।।१ ।।
भारतभूची बघुनि दुर्दशा, सोडुनि वेकुंठाला।
ये धावत, नच वेळ करी, प्रभु ! टाकुनिया गरुडाला 11२ ।।
दु:ख न बघवे दारिद्रयाचे, अन्न न मिळत कुणाला।
दयावंत हे नुरले जगती, कोव न ये धनिकाला।।३॥|
प्रेम कुणाचे नाहि कुणासी, स्वार्थचि ज्याला त्याला ।
बघुनि अशी ही हीन अवस्था, का तू टूर पळाला?।।४॥।
पाहू नको बघ, अंत आमुचा, घे पदरी गरिबाला।
तुकड्यादास म्हणे -निववी प्रभु ! दावुनि मार्ग अम्हाला ।।५ ।।