भारताच्या सुपुत्रांनो ! निकामी स्वस्थ का बसला ?

(चाल: अगर हे ग्यायको पाना...)
भारताच्या सुपुत्रांनी । निकामी स्वस्थ का बसला ?
धैर्यंबल खोवुनी सगळे, भिकारी दास का झाला? ।।धृ0।।
बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा ।
शिवाजी, शिवबा म्हणतांना, रायगडी छत्रपति झाला ।।१।।
कधी शिवला न   भीतीला, रंगला   राजनीतीला ।
म्हणे दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला ।।२।।
गर्जुनी सिंह जणु गेला, मिळवला तोरणा किल्ला ।
राष्ट्र-परदास्य सोडूनी, सुखी केले जना  सकला ।।३।।
शोभते का तुम्हा ऐसे ? तयाचे     वंश   म्हणऊनी ।
प्राण द्या राष्ट्रसेवेला, भीतिने भ्याड का झाला ? ।।४।।
अहो ! मरणे अणि जगणें, दोन्हिही सारखे अपणा ।
तो तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ।।५।।