प्रार्थितो संत - साधूंना, शक्ति द्या

(चाल; भारताच्या सुपुत्रांनो... )
प्रार्थितो संत-साधूंना, शक्ति द्या-बुध्दि द्या लोका ।
जाहला देश दुर्बल हा, लाज राखा न घ्या शका ।।धृ0।।
अजवरी संतसाधूंनी, जगविला, देश बोधूनी ।
पुन्हा ती वेळ दिसताहे, समजुनी साथ द्या रंका ।।१।।
बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी ।
मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, शुरत्वे   टाळण्या   धोका ।।२।।
बहू दिवसांची ही रुजली, विषमता पंथ जातियता ।
करा नवनिर्मिती जमुनी, वाजवा  भारती   डंका ।।३।।
लोक हे, वीर हो सारे, तपस्वी   कष्ट   करणे ।
म्हणे तुकड्या अभय वर द्या,दीनांची हाक ही ऐका ।।४।।