नेणो कुणी दुजा, गुरुविण

नेणो कुणी दुजा, गुरुविण ।।धृ०।।
करुनि साधना की सुख भोगू, थोडे दिवस मजा ।।१।।
धर्म करोनी स्वर्गी जाऊ,. तेथूनि होइ सजा1।२।।
रिव्हि सिद्धि ही प्रसन्न करुनी, होइल भक्ति वजा ।।३।।
सद्गुरू तो मम अंतरि ताइत, देइल  भोगि   रजा |।४।।
तुकड्यादास म्हणे गुरु दैवत, हृद्यांतरिचि ध्वजा ।1५।।