आधि करा रे ! पाठ धडा हा, जा सद्गुरुच्या पद्युग्मा
आधि करा रे ! पाठ धडा हा, जा सद्गुरुच्या पदयुग्मा ।।धृ०।।
मान, सुमानहि वैभव सारे, त्यागुनि हरिचरणासि नमा ।
जागृति-स्वप्न -सुषुप्ती -तुर्या, गुरु-स्मरणाचा मार्ग क्रमा ।।१।|
भ्व-भ्रांतीचा विसर पडे जव, बाणे शरिरी क्षेमक्षमा |
मी-तू भाव मनाचा हरुनी, आत्मसुखाशी नित्य रमा ।।२।।
शब्द परोक्षा द्या टाकुनिया, अपरोक्षाचा पंथ क्रमा |
श्रीगुरू साक्षी आडकुजीचा-तुकड्या मागे हेचि जमा ।।३॥