धर्म लयाला जातो म्हणुनी, रामकृष्ण हरी आला
(चाल: संसाराचा बोझ वाहता...)
धर्म लयाला जातो म्हणुनी, रामकृष्ण हरि आला ।
सगळ्या जनतेशी बोला ।।धृ0।।
एकाचे अवतार तिघेही, एके ठायी आले ।
दास टेकडीवरती बसण्या, अति उत्सुक ते झाले ।
संत तुकाचा मंत्र गोड हा-
पुन्हा पुन्हा जपण्याला ।। सगळ्या0 ।।१।।
पंढरपुरची वारी करण्या, लांब लांब का जाता ।
इथेच येउनि सदा बसावे, वाटतसे भगवंता ।
चला चला गुरुकुंज बघाया-
शांती देई मनाला ।। सगळ्या 0 ।।२।।
अध्यात्याचे केंद्र असे हे, संत महंत वदताती ।
दानाचे अती महात्म्य येथे, पाप तापही जाती ।
अखंड दानी, अखंड यात्री-
मिळताती तुकड्याला ।। सगळ्या0 ।।३।।