मज वेडचि गुरुकुंजाचे । आवडतो मज कणकण तिथला, न सुटे प्रेम मनाचे
( चाल : तेरा मन दर्पण कहलाये...)
मज वेडचि गुरुकुंजाचे ।
आवडतो मज कणकण तिथला, न सुटे प्रेम मनाचे ।।धृ0।।
फळाफुलांनी मार्ग बहरला, अति निर्मळता भासे ।
चौकावरती मित्रमंडळी, करि जयगुरु उल्हासे ।।
द्वारावरती बोधवचंन ते, जो तो थांबुनि वाचे ।
मज वेडचि गुरुकुंजाचे 0।।१।।
गंभीर मन अति शांत करोनी, जाती जन प्रार्थाया ।
विनग्रभावे नमन करोनी, स्तविती, त्या गुरुराया ।।
प्रसन्नता त्या निरांजनीची, चिंतन विश्व - सुखाचे ।
मज वेडचि गुरुकुंजाचे0।।२।।
विश्व - मिलन हे मंद्रितले, भरले मानवतेनी ।
सर्व धर्म अणि पंथ एकची, वाटे बघता कोणी ।।
चित्त मोहुनी जन धन विसरे, ध्यान लावि स्वरुपाचे।
मज वेडचि गुरुकुंजाचे0।।३।।
नव्या युगाचा मंत्र मिळतसे, नव्या मनूची गाथा ।
जातपात ही विसरुनि सगळे, बोलति भारतमाता ।।
तुकड्यादास म्हणे मज दुसरे, दैवत नाहि सुखाचे ।
मज वेडचि गुरुकुंजाचे0।।४।।
-बिर्लामन्दिर दिल्ली ,दि. 0१-0९-१९६७