आळशा ! तुजभोवती ही ज्ञानगंगा वाहते

(चाल : सावळ्या ! ये निर्लाम बा...)
आळशा ! तुजभोवती ही   ज्ञानगंगा   वाहते ।
लाभ तरि घेता तिचा, का कोरडे मन राहते ? ।।धृ0।।
प्रात:काळी ध्यान चाले, आत्मचिंतन, प्रार्थना ।
स्वर मधुर ऐकी जरा, मग पाप सगळे  वाहते ।।१।।
नेत्रमिलनाचे अमोलिक, संत - दर्शन   होतसे ।
स्वानुभूती साक्ष दे  बघ, विश्वरुप  हे  भासते  ।।२।।
सत्वगुण अति शांत झरतो, नित्य गुरुकुंजात या ।
दास तुकड्या सांगतो,ना क्षण फुका खोवी  इथे ।।३।।