नामाचा बाजार संतादारी

(चाल: पायल की झमकार रस्ते स्स्ते...)
नामाचा बाजार, संतादारी ।
अमृताची  धार, संतादारी-
प्रेमाचा व्यापार, चाले भारी ।
अमृताची   धार, संतादारी ।।धृ0।।
घेणाऱ्याची गर्दी दिसे पण वेळ नसे खाली ।
भरला दरबार भासे, जनता आतुर झाली ।।
देती घेती जे ईमान, संताचे प्रमाण -
सर्वांशी चढली तारी, संतादारी । नामाचा0।।१।।
संत प्रेमाचे    माहेर, सगळे   जाणे । 
त्यासी शरण जावे लागे, जीवे प्राणे ।।
अभिमान लोभ घाण, दिले दान,
धरली      वारी,      संतादारी । नामाचा0 ।।२।।
संत संग ज्यासी, घडे   नरदेही ।
पुन्हा त्यासी जन्म - मरणचि नाही ।।
तुकड्यादास म्हणे, ऐका आनंदाने,
आता दिवस चारी, संतादारी । नामाचा0 ।।३।।