मंडळाच्या सेवका सेवाभाव सोडि ना

(चाल: चला बाई पांडुरंगे पाह वाळवंटी...)
मंडळाच्या सेवका सेवाभाव   सोडि   ना ।
विघ्न किती येवो तरी, खेद मना मानि ना ।।धृ0।।
भारताचे पुत्र अम्ही, नांदु   एक    होउन ।
जातपात नाही आम्हा, मानवा सि सोडुन ।
प्रार्थनेच्या रंगी रंगू, हीच   करू   याचना ।।१।।
शेतकरी कामकरी, होउनि     गोपाल ।
गायी राखू, काम शिकू, यातची निहाल ।
गुरुदेव-मंडळासि, तोडविता   तोडि   ना ।।२।।
गावकरी एक होऊ, रामधुनी   जावया ।
झाडयूड करु सारे, मार्ग स्वच्छ दावूया ।
एक स्वरे गाउ सारे, धन्य म्हणवु आपणा ।।३।।
व्यायामासि जाउ सारे, साजवू मैदान ।
सानथोर मिळूनिया, व्हावया बलवान ।
देश शक्तिवान करू, हीच  धरु   भावना ।।४।।
उद्योगासि घरोघरी, हर्षवुनी लावुया ।
स्वावलंबी वृत्ति धरु, आणिकांसि दावुया ।
दास तुकड्याची हाक, ऐक गड्या ! ऐकना ।।५।।