यारे या सगळे , करु दर्शन देवाचे

(चाल: हरहर बोलना...) .
यारे या सगळे, करू दर्शन देवाचे ।
दिवस     सुखाचे,      स्वातंत्र्याचे ।।धू0।।
या रे हरिजन ! या संदिरि उघडे करु या ।
जातीपंथ अता   विसरुनिया   जाऊ  या ।
नंदादिप     उजळु    या   मानवधर्माचे ।।
दिवस    सुखाचे,       स्वातंत्र्याचे 0।।१।।
दिसती विहिरी या, पाणि भरु हर्षाने ।
दिधला हुकुम असा, अपुल्या सरकाराने ।
स्पृश्यास्पृश्य   अता  सरले   जातियतेचे ।।
दिवस     सुखाचे,     स्वातंत्र्याचे  0।।२।।
आली संक्रांती, नवक्रांती दर्शाया ।
तिळगुळ वाटु चला, हरिजनांच्या घरि या ।
तोडू बंधन हे, होते बहु   दिवसाचे ।।
दिवस       सुखाचे,   स्वातंत्र्याचे  0।।३।।
आले सतयुग रे ! जिकडे तिकडे सांगा ।
आता न्यायाने, बलधर्मनि     वागा ।
तुकड्यादास म्हणे हित हे भारतभूचे ।।
दिवस      सुखाचे,     स्वातंत्र्याचे 0।।४।।